मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गंभीर आजारामुळे राज्यात निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना भाजपाचे अध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी तूर्त मुख्यमंत्री बदलण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. ...
पर्रीकरांची विजिगीषु वृत्ती त्यांना या लढ्यात यश देईल आणि ते त्यातून लवकरच बाहेर पडतील अशी आम्हाला खात्री आहे. पण सध्या त्यांच्या आजाराचे नेमके कारण आणि स्वरूप गुलदस्त्यात आहे. ...
मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता ताबा मनोहर पर्रीकर यांनी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपवावा अशी स्पष्ट मागणी प्रथमच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) शनिवारी येथे केली. ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना पुढील उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. यासाठी गोव्याहून एका विशेष विमानाने ते दिल्लीला रवाना होणार आहेत. ...
गेले दोन दिवस कलंगुट येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ढासळल्यामुळे राज्यात नेतृत्वबदल अपरिहार्य बनला आहे. ...