मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
ज्याच्या हाती ससा तो पारधी अशा प्रकारची स्थिती राजकारणात असते. सध्या मंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे सहा आमदारांची मोट असल्याने विद्यमान अस्थिरतेच्या स्थितीत मगोपाचे ज्येष्ठ नेते मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यापेक्षा गोवा फॉरवर्डचे नेते व कृषी मंत्री विजय ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गंभीर आजारी होऊन इस्पितळात आहेत आणि त्यांचे दोन मंत्रीही इस्पितळात असताना सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीमध्ये कुरबुरी वाढलेल्या असताना विरोधी काँग्रेसने सत्ता बदल घडवून आणण्यासाठीचे प्रयत्न गतिमान केले आहेत. ...
केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व खासदार विनय तेंडुलकर या तिघांनाही शहा यांनी दिल्लीला बोलावले होते. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यातून दिल्लीला गेल्यास तीन दिवस झालेत. निरीक्षक दिल्लीला परतल्यास दोन दिवस पूर्ण होतील. बुधवारी ते आपला अहवाल पक्षाध्यक्ष अमित शहा यांना देतील, असे म्हणतात. त्यानंतर अमित शहा म्हणे पर्रीकरांची भेट घेतील. ...