मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
मी अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही. माझा विश्वासघात झाला आहे. मी कार्यकर्त्यांशी बोलेन व पुढे काय करायचे ते ठरवेन, असे म्हापसा मतदारसंघाचे भाजपा आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी मंगळवारी सांगितले. ...
मी वीस वर्षे भाजपासोबत राहिलो. वीस वर्षे मी भाजपाशी निष्ठा ठेवली. माझ्या निष्ठेची हिच का भाजपाने कदर केली असा संतप्त प्रश्न भाजपाचे ज्येष्ठ आमदार व मावळते मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी विचारला आहे. ...
आजारपणामुळे कार्यक्षमता हरवून बसलेले सरकार आणि त्याच्या हतबलतेचा लाभ उठवण्यात असमर्थ ठरलेला विरोधी पक्ष यांनी गोव्यातील नव्या राजकीय थ्रिलरला करुण विनोदाचा आयाम दिला आहे. ...