मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
लोकसभा निवडणुकीवेळी गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ जिंकायला हवेत, असे लक्ष्य समोर ठेवून गोवा भाजपा तयारी करत असताना दुस-या बाजूने मात्र सत्ताधारी घटक पक्षात आणि भाजपा संघटनेंतर्गत वाद उफाळून आलेले असल्याने भाजपासाठी सध्याचा काळ हा खूप तापदायी ठरलेल ...
काँग्रेसच्या सोळा आमदारांनी सही करून आपल्याला पदावरून काढण्यासाठी जी नोटीस दिली आहे, त्या नोटीसीविषयी मी बुधवारी सायंकाळी किंवा गुरुवारपर्यंत म्हणजे लवकरच निर्णय घेईन, असे गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी येथे सांगितले. ...
मी अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही. माझा विश्वासघात झाला आहे. मी कार्यकर्त्यांशी बोलेन व पुढे काय करायचे ते ठरवेन, असे म्हापसा मतदारसंघाचे भाजपा आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी मंगळवारी सांगितले. ...