मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
जुगार, दारू हे सगळे महात्मा गांधी यांच्या तत्त्वांविरुद्ध असल्याने गोवा सरकार मांडवी नदीतील कॅसिनो जुगार महात्मा गांधी जयंतीदिनी बंद ठेवण्यास व्यवसायिकांना भाग पाडते. ...
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत या सरकारचा भ्रष्टाचार शिगेला पोचला असल्याचा आरोप केला. भ्रष्टाचाराचे वेगवेगळे मार्ग या सरकारने अवलंबिले असून पक्षाच्या कायदा विषयक पथकाने अभ्यास केल्यानंतर वरील निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. ...
मंत्रिमंडळ विस्तारावरून गोवा प्रदेश भाजपाच्या राज्यभरातील हजारो कार्यकर्त्यांमध्ये जी अस्वस्थता निर्माण झाली होती, त्या अस्वस्थतेला तात्पुरता विराम देण्यात सध्या तरी भाजपाचे नेते यशस्वी ठरले आहेत. ...
गोव्यात मोठा गाजावाजा करुन स्थापन करण्यात आलेल्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे काम थंडावले असून गेल्या काही महिन्यात मंडळाच्या बैठकाच झालेल्या नाहीत. ...
मंत्रिमंडळ विस्ताराच्या विषयावरून कार्यकर्त्यांनी त्यांची मते व्यक्त केली तरी, आम्ही चर्चा करून कार्यकर्त्यांना विषय पटवून दिला व त्यामुळे वाद मिटला असा दावा तेंडुलकर यांनी केला. ...