मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि कळंगुटचे वादग्रस्त ठरलेले आमदार मायकल लोबो यांची सगळी कारकीर्द जरी वादांचीच असली तरी, पर्रीकर आणि लोबो यांच्यातील मैत्री मात्र ब-याच काळापासूनची आहे. ...
गोव्यात खनिज खाण अवलंबितांचे आंदोलन एकाबाजूने उग्र रूप धारण करू पाहत असताना दुस-या बाजूने गोवा विधानसभेचे उपसभापती असलेले भाजपाचेच आमदार मायकल लोबो यांनी शुक्रवारी सरकारविरुद्ध जोरदार हल्लाबोल केला. ...
मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलातून डावलण्यात आलेले उपसभापती मायकल लोबो यांनी अप्रत्यक्षपणे नोकरभरतीवरून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला. ...
गोव्यातील खाण लिजांच्या बेकायदेशीर नूतनीकरण प्रकरणात प्रदेश कॉंग्रेसने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलीस मुख्यालयात तक्रार केली आहे. ...