मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
मंत्र्यांना अतिरिक्त खाती देऊन मंत्र्यांमधील असंतोष कमी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे शुक्रवार (12 ऑक्टोबर)व शनिवारी(13 ऑक्टोबर) दिल्लीतील एम्स इस्पितळात होणा-या बैठकीत करतील. ...
पर्यटन व्यवसायाबरोबर वाढत्या गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तर गोव्यात खास करुन बार्देस तालुक्यातील किनारपट्टी भागातील वाढत्या गुन्हगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून पावले उचलण्यात येत आहे. ...
भाजपाचे कळंगुटचे असंतुष्ट आमदार मायकल लोबो हे अलिकडे वारंवार पदाचा राजीनामा देण्याची भाषा करू लागल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी आता प्रथमच लोबो यांना अप्रत्यक्षरित्या आव्हान दिले आहे. ...