मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
राज्यातील खनिज लिजांच्या नूतनीकरण प्रकरणी लोकायुक्त सखोलपणो पुढील चौकशी करणार आहे. आता राज्याचे मुख्य सचिव धमेंद्र शर्मा यांनाही गोवा फाऊंडेशनने या प्रकरणी प्रतिवादी केले आहे. ...
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाल्याचे सांगण्यात येत असलेली गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक झालीच नसल्याचा दावा कॉंग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे. ...
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्याविरुद्ध शरसंधान करत भाजपाच्या कार्यकर्त्यांमधील असंतोष चेतविण्याचे काम चालविल्यानंतर प्रदेश भाजपा हळूहळू चिंताग्रस्त बनू लागला आहे. ...
सत्ता टिकावी म्हणून पक्षाच्या ध्येय धोरणांना तिलांजली देवून नीतीमत्ता सोडून दुस-या पक्षातील आमदार आयात करण्याच्या प्रकाराचे दुरोगामी परिणाम पक्षाला भोगावे लागतील असा गंभीर इशारा भाजपा जेष्ठ नेते माजी मंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी दिला आहे. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची सद्याची शारीरिक स्थिती लक्षात घेऊन सध्या भाजपाचे कुणीच केंद्रीय नेते किंवा गोवा भाजपामधीलही नेते पर्रीकर यांच्याशी जास्त संवाद साधू शकत नाहीत. ...