मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अचानक आपल्या करंजाळे-दोनापावल येथील निवासस्थानी येत्या 31 रोजी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी 30 रोजी मुख्यमंत्री आपल्या निवासस्थानीच राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) बैठक घेणार आहेत. ...
मनोहर पर्रीकरांच्या प्रकृतीविषयी माहिती जाहीर करण्यासाठी काँग्रेसने भाजपाला चार दिवसांची मुदत दिली असून, अन्यथा काँग्रेस कोर्टात जाईल आणि कमिशनर नेमून चौकशी करावी अशी मागणी करील, असे त्यांनी सांगितले. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्यातील माजी संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी पूर्णवेळ राजकारणात उतरून गोव्यातील सध्याची राजकीय नेतृत्वाची पोकळी भरून काढावी, अशा प्रकारचा आग्रह सर्व स्तरांवरून वाढू लागला आहे. ...