मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अनेक महिन्यांच्या खंडानंतर बुधवारी करंजाळे येथील आपल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. नोकर भरतीबाबतचा मुद्दा मंत्र्यांनी बैठकीत उपस्थित केला. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हयातच नाहीत अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते जितेंद्र देशप्रभू यांनी केल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अनेक महिन्यांच्या खंडानंतर त्यांच्या खासगी निवासस्थानी राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) बैठक घेतली. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काही महिन्यांच्या खंडानंतर मंगळवारी राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) बैठक घेतली व त्यावेळी एकूण 230 कोटी रुपये गुंतवणुकीचे एकूण 7 प्रस्ताव मंजुर केले. दोन प्रकल्पांना दिलेली मान्यता मागे घेतली गेली. ...
सरकारी फाइल्सवरील मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या सह्या बोगस असल्याचा तसेच त्यांचे कोणीतरी नातेवाईक किंवा अधिकारी सह्या करीत असावेत, असा संशय काँग्रेसने व्यक्त केला आहे. ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या राजकारणात सक्रीय नाहीत. त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचं पथक त्यांच्या निवासस्थानी तैनात करण्यात आले आहे. ...
मनोहर पर्रीकर अनेक महिन्यांच्या खंडानंतर आपल्या निवासस्थानी बुधवारी (1 नोव्हेंबर) मंत्रिमंडळाची बैठक घेत असल्यानं बहुतेक मंत्र्यांमध्ये उत्सुकता आहे. ...
केंद्र सरकार आर्थिक संकटात आहे, राज्याला महसूल उभारण्यात मर्यादा आहेत, त्यात राजकीय नेतृत्वाला स्वार्थाने ग्रासले आहे, मगोपने इशारा दिलेला आहे, अप्रामाणिक नेत्यांना सत्ता ताब्यात घेण्याची घाई झाली आहे, त्यामुळे गोवा अधोगतीच्या खाईत ढकलला जात आहे. ...