मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
अनेक वर्षे संघाचे संघचालक म्हणून राहिल्यानंतर आणि अनेक आंदोलने केल्यानंतर आता राजकारणात उतरण्याचा घेतलेला निर्णय समाजाची गरज म्हणूनच घेतला असल्याचे माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी म्हटले आहे. ...
खाणींच्या बाबतीत वटहुकूम न काढता केंद्र सरकारने थेट एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करुनच गोव्यातील खाण अवलंबितांना न्याय द्यावा, अशी मागणी गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष पुती गावकर यांनी केली आहे. ...
गंभीर आजाराने त्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सात दिवसांच्या आत पर्याय व्यवस्था करावी, अन्यथा येत्या 16 नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी दिला आहे. ...
दिवाळीच्या निमित्ताने मनोहर पर्रीकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आजाराशी लढणाऱ्या पर्रीकरांनी एका ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून सर्वांनाच दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
शारीरिक, मानसिक दौर्बल्य असणारे राजकीय नेते जगभर कुठेच स्वीकारले जात नाहीत. त्यांची निर्णयक्षमता खात्रीने लयास गेलेली असते. त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे ही क्रौर्याची परिसीमा असते.. ...