मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
गोव्यातील भाजपाप्रणीत सत्ताधारी आघाडीचा भाग असलेल्या मगो पक्षाने सत्तेत राहूनच गोवा विधानसभेच्या सभापतींच्या निर्णयाविरुद्ध व दोन माजी आमदारांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका सादर केल्याने सरकारमध्ये खळबळ माजली आहे. ...
गोव्याचे सत्ताधारी आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी सरकारवर पुन्हा एकदा आगपाखड करीत किनारा साफसफाईचे कंत्राट देण्याचे काम पर्यटन खात्याकडून काढून न घेतल्यास कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गंभीर आजारी असल्याने गेले नऊ महिने गोव्याचे प्रशासन ठप्प झाले व याची प्रचिती सरकारमधील मंत्री आणि आमदारही जाहीरपणे देत असल्याने राज्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी गोवा सुरक्षा मंच पक्षात रितसर प्रवेश केला असून त्यांची पक्षप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. ...
मनोहर पर्रीकर यांनी सन्मानाने मुख्यमंत्रीपद सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुङो फिलिप डिसोझा यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली. ...
राज्यातील खनिज खाणी जर येत्या 15 डिसेंबरपर्यंत सुरू झाल्या नाहीत तर सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीमधून मगो पक्ष बाहेर पडेल, असा इशारा मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिलेला असला तरी, भाजपाने अजून या धमकीची तूर्त गंभीर अशी दखल घेतलेली नाही. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे दैनंदिन कामांमध्ये सक्रिय नाहीत, ते सचिवालयात तथा मंत्रालयात येऊ शकत नाहीत, अधूनमधून त्यांना इस्पितळातही जाऊन यावे लागते या सर्व स्थितीत सध्या त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सैरभैर झालेले आहेत. ...