मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व भाजपा आमदार व भाजपाच्या मंत्र्यांना शनिवारी सायंकाळी बैठकीसाठी बोलावलेले असले तरी, ज्येष्ठ आमदार असलेले भाजपाचे माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे मात्र या बैठकीला जाण्यासाठी उत्सुक नाहीत. ...
पर्यटकांकडून सार्वजनिक ठिकाणी खास करुन किनारी भागात होत असलेल्या उपद्रवावर संताप व्यक्त करुन मागील विधानसभा अधिवेशात पर्यटन व्यापार कायद्यात दुरुस्ती करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपणाला दिले होते. ...
मी उपोषण अजून सोडलेले नाही. चोवीस तासांत किंवा त्यानंतर मी योग्य तो निर्णय घेईन, असे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी मंगळवारी (27 नोव्हेंबर) लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले. ...