मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या पाचपैकी तीन राज्यांमध्ये भाजपाच्या वाट्याला आलेली स्थिती पाहता गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या मागणीला आता वेग येणार आहे हे स्पष्ट झाले. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गंभीर व अनेक महिन्यांच्या आजारामुळे प्रशासन ठप्प झाल्याने पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीबाबत अत्यंत नकारात्मक भावना गोव्याच्या जनमानसात निर्माण झालेली आहे. ...
पक्षाने सांगितल्यास गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत निश्चितच सुधारणा झालेली आहे. मात्र, ते पर्वरी येथील सचिवालयात येऊन काम सुरू करणे हे जवळजवळ अशक्य बनलेले आहे. ...