मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांची आरोग्य तपासणी करून अहवाल सादर करायला लावण्याची मागणी करणारी माहिती हक्क कार्यकर्ते ट्रॉजन डिमेलो यांची याचिका खंडपीठाने फेटाळून लावली. ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांचे वाटप केले जाईल, अशी चर्चा गेल्या सप्टेंबर महिन्यापासून सुरू झाली तरी त्यानंतर व अगदी अलिकडेपर्यंत झालेल्या हालचालींनंतर आता अतिरिक्त खाते वाटपाची शक्यता ...
गोव्यात भाजपामध्ये पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून केले जात असलेले संघटनात्मक बदल पाहून या प्रदेशात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका येतील अशा प्रकारच्या चर्चेने वेग घेतला आहे. ...
राज्य प्रशासन वेगाने चालण्यासाठी नेतृत्व बदल व्हावा किंवा अतिरिक्त खाती तरी दिली जावी, अशी मागणी घेऊन काही मंत्र्यांनी आणि आमदारांनी खूप लॉबिंग केले. ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा आज वाढदिवस आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नाहीय. या पार्श्वभूमीवर लाडक्या नेत्याला दीर्घ आयुष्य लाभावे, अशी प्रार्थना भाजपा कार्यकर्ते आणि त्यांच्या हितचिंतकांनी देवाकडे केली आहे. ...