मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
गंभीर आजारामुळे आपल्या निवासस्थानीच राहणारे व गेले तीन महिने सचिवालय तथा मंत्रलयापासून दूर राहिलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अचानक सक्रियतेमुळे गोव्यात पुन्हा वेगळ्या अर्थाने चर्चेत येऊ लागले आहेत. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजाराचा तपशील मागणारा अर्ज राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगून उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळून लावला. ...
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. ...