मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
राफेल व्यवहाराच्या महत्त्वाच्या फाइल्स मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बेडरुममध्ये असल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस समितीचे संशोधन विभागाचे निमंत्रक तथा खासदार राजीव गौडा यांनीही केला आहे. ...
Rafale Deal : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरुन पुन्हा एकदा मोदी सरकार आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर येत्या 30 रोजी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. तीन दिवसांच्या विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सोमवारी पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पात झालेल्या बैठकीवेळी निश्चित करण्यात आले. ...
गोव्यातील बंद असलेल्या खाण व्यवसायावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त करताना हा व्यवसाय पुन्हा सुरु व्हावा यासाठी तोडगा काढण्याचेही आश्वासन दिले आहे. ...
गोव्यातील सत्ताधारी आघाडी आणि एकूणच स्थिरता सत्ताधारी आघाडीचा महत्त्वाचा भाग असलेल्या मगो पक्षाच्या हट्टामुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...