मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
शिरोडा तसेच मांद्रे मतदारसंघाच्या पोटनिवडणुका लवकरच जाहीर होण्याच्या मार्गावर असल्या तरी उमेदवारीवरुन निर्माण झालेला तिढा अद्यापपर्यंत सुटला नाही. निर्माण झालेल्या तिढ्यामुळे या मतदारसंघातील रंगत वाढत चालली आहे. ...
गोव्यातील पर्रीकर सरकारच्या स्थिरतेविषयी नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावेळी सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षांनीच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मगोप आणि गोवा फॉरवर्ड या दोन घटक पक्षांमध्ये वाद सुरू झाला असून सरकार पडू शकते, अशी विधाने घटक पक्षच करू ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिल्लीच्या एम्स इस्पितळामधून बुधवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर मनोहर पर्रीकर बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गोव्यात दाखल झाले आहेत. ...
पणजी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर औषधोपचारांसाठी पर्रीकर एम्समध्ये दाखल ... ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमधून येत्या दोन दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. ...