मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
सत्ता ही किती क्रूर असते, याचा अनुभव पर्रीकरांचे कुटुंबीय घेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला सारे पक्ष आणि त्यांचे नेते संगीत खुर्चीच्या खेळात बेशरमपणे गुंतले आहेत. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या तब्येतीवरुन दिवसभर राज्यात आणि राज्याबाहेरही प्रचंड अफवा पसरल्या. मनोहर पर्रीकर कोमात गेल्याचीही चर्चा काही जणांनी पसरविली, पण स्थिती तशी नाही. मनोहर पर्रीकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात ...
शिरोड्याचे भाजपाचे नेते महादेव नाईक यांच्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्री व भाजपाचे पहिल्या श्रेणीचे नेते लक्ष्मीकांत पार्सेकर बंडखोरी करायला प्रवृत्त झालेत याचे कारण त्यांच्या अस्तित्वाला निर्माण झालेला धोका हेच आहे. ...
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभा पोटनिवडणुकीच्या विषयावरून भाजपामध्ये बंडाची भूमिका घेतली आहे. मगो पक्ष पार्सेकरांना प्रसंगी तिकीटही देऊ शकतो पण लक्ष्मीकांत पार्सेकर अपक्ष निवडणूक लढवतील असे दिसते. ...
गोव्यात विधानसभेच्या दोन मतदारसंघांमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकांवेळी भाजपाच्या उमेदवारांविरुद्ध मगोपने उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सत्ताधारी आघाडीत संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. ...