मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते या कविवर्य सुरेश भटांच्या ओळी र्पीकर यांच्या निधनाच्या वृत्तानंतर अनेकांना आठवल्या. गेले वर्षभर कॅन्सरशी झुंजल्यानंतर व प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर आजारपणातही गोव्याची चिंता वाहिलेला हा नेता शेवटी धारातीर्थी पडला ...
Manohar Parrikar Death: गोव्याला स्थैर्य मिळवून देण्यात पर्रीकरांचा सिंहाचा वाटा आहे. कायम राजकीय अस्थिरता अनुभवणाऱ्या गोव्याने पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली स्थैर्य अनुभवलं. ...