मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
गोव्यात नेतृत्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारी मध्यरात्री दाखल झाले तरी, भाजपप्रणीत आघाडीचे घटक पक्ष ऐकत नसल्याने गडकरी गोव्याचा नवा मुख्यमंत्री कोण ते ठरवू शकले नाहीत. ...
दोघे मित्र.... दोघांच्या वाटा वेगळ्या, एक जण पत्रकारितेत संपादक तर दुसरा राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या पदावर. पण मैत्र हा दोघांना एकत्र आणणारा समान धागा. अर्थात हे आहेत दिलीप करंबेळकर आणि मनोहर पर्रीकर. दोघांच्या खूप वर्षांच्या मैत्रीबद्दलच्या आठवणी ...