मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
गोव्याचे मुख्यमंत्री व भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी (17 मार्च) संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते स्वादुपिंडाशी संबंधित ... ...
राजकारणात यशस्वी होऊन मुख्यमंत्री बनल्यानंतरही त्यांनी स्वत:ला स्वयंसेवक म्हणवून घेण्यास कधी संकोच बाळगला नाही. उलट संघाच्या संस्कारांमुळेच आपल्याला सामाजिक दृष्टी मिळाल्याचेही ते अनेकदा सांगत होते. ...
जन्माने पर्रा गावचे; पण कर्माने म्हापशेकरांचे अशी ओळख असलेले मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा शहराच्या सीमेवर वसलेल्या पर्रा या शांत तसेच निसर्गरम्य गावी झाला. ...
म्हापशापासून काही अंतरावर असलेल्या ज्या पर्रा गावात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जन्मले त्या गावाची खासियत म्हणजे तेथील चविष्ट कलिंगड. पर्रीकर आपल्या भाषणांतून अनेकदा या कलिंगडांची खासियत सांगत असत. ...