मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
राष्ट्रीय स्तरावरही नाव आणि कीर्ती मिळविलेले नेते स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांची पुण्यतिथी काल झाली. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मुख्यमंत्री म्हणून सहा वर्षांचा कालावधी उद्या १९ रोजी पूर्ण होत आहे. ...
(स्व.) पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांचे अनेक आमदार, मंत्र्यांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. अनेकांना पर्रीकरांमुळेच मंत्रीपद लाभले. पर्रीकरांनी अनेक तरुणांना आमदार म्हणून तयार केले होते. पण पैकी काहीजणांनी नंतरच्या काळात त्यांचा आदर्श घेतला नाही. यापैक ...
पर्रीकर यांच्या काळात नोकऱ्यांची विक्री करण्याचे कुणाचे धाडस झाले नाही. कुणी तसा प्रयत्न करत असल्याचे कळले तरी पर्रीकर त्याला खडसवायचे. पर्रीकर अत्यंत संताप व्यक्त करून कार्यकर्त्यांना कारवाईची भीती दाखवायचे. यामुळे नोकऱ्यांचा बाजार त्यावेळी भरला नव् ...