Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. Read More
जनतेचा सरकारवरील विश्वासाला तडा जात असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. पंतप्रधान मोदींनी मणिपूरवर बोलावे अशी आमची इच्छा आहे, पण ते ऐकत नाहीत, म्हणून आम्ही अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. ...