अमरावतीत घडलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी येथे संचारबंदी तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच काही ठिकाणी इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत ...
रजा अकॅडमीच्या येथील कार्यालयावरील छापेमारीत काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. हे गोपनीय पुरावे न्यायालयात सादर केले जाणार आहेत. दगडफेक, मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आतापर्यंत ५२ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. निरपराध लोकांवर कुठल्याही ...
पोलिसांनी गृह मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात काही मुस्लिम संघटना आणि राजकीय पक्षांशी संबंधित लोकांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगण्यात आले आहे. ...
त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ गेल्या शुक्रवारी बंदचे आवाहन केलेल्या रजा अकॅडमीच्या लल्ले चौकातील कार्यालयावर मंगळवारी दि(१६) मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकून कागदपत्रे जप्त केली आहेत तर रजा अकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. ...
मालेगाव शहरात शुक्रवारी दगडफेकीचा प्रकार घडला होता. या दगडफेकीच्या घटनेत ११ लाखांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे मंगळवारी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत ख ...
मालेगाव : त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले होते. गेल्या शुक्रवारी (दि.१२) दगडफेक, तोडफोडीची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी दगडफेक व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अटकसत ...
Nawab Malik Talk on Amravati, Nanded, Malegaon Violence: अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे लोकांनी शांतता ठेवली पाहिजे. काही लोक कारस्थाने रचत आहेत. त्याला लोकांनी बळी पडू नये, असे आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे. ...
त्रिपुरा येथे मुस्लिम समाजाच्या नागरिकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचे पडसाद शुक्रवारी (दि. १२) मालेगाव येथे उमटून विविध मुस्लिम संघटनांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले. दुपारपर्यंत बंद शांततेत पाळला जात असताना सायंकाळी किदवई रोडसह जुना आग्रारोडव ...