२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
चिखली मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यंदा येथे २४ उमेदवार रिंगणात असले तरी, सामना परंपरागत प्रतिस्पर्धी भाजप व काँग्रेसमध्येच आहे. ...
महाविकास आघाडीसमोर निवडणुकीसाठी मुद्देच उरले नसून ते समाजाला जाती-जातींमध्ये विभाजित करून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहेत, असे फडणवीस म्हणाले. ...
मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी ७२ हजार कोटी गुंतवणुकीचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. महामार्गांचे जाळे विस्तारण्यात येत आहे, वॉटर ग्रीड प्रकल्पामुळे दुष्काळातून कायमची मुक्ती होणार, असे दानवे यांनी मुलाखतीत सांगितले. ...
"भाजप ध्रुवीकरणाचे राजकारण करत आहे. गुतंवणूक, उद्योग, रोजगार, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्रासाठी काय करता येईल, यावर चर्चा होऊ शकते. मात्र, भाजपला या मुद्यावर चर्चा करायची नाही", असे सचिन पायलट म्हणाले. ...