Maharashtra Monsoon Session 2023 Live UpdatesFOLLOW
Maharashtra monsoon session, Latest Marathi News
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३ राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबईत होणार आहे. १९ दिवसांच्या या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवस असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत. भाजप-शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शक्तिशाली सत्तापक्षासमोर विरोधी पक्षांची कसोटी लागेल. सत्तापक्षाकडे आज विधानसभेचे २००हून अधिक आमदार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक अधिवेशनात सत्तापक्षांची किती कोंडी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Read More
राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड केलीय का, त्यातले किती जगले, किती पैसे खर्च झाले. गैरव्यवहार झालाय का अशाप्रकारे विविध आरोपांवर चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. ...
Nana Patole demanded: शपथविधीला महिना उलटला तरी अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, याबाबत स्पष्टता येऊ शकलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या बरोबर किती आमदार आहेत, याबाबत विधानसभा अध्यक्षांनी संभ्रम दूर करावा, अशी मागणी काँग्र ...