राज्यात सरासरीच्या केवळ ७८ टक्के पाऊस पडला असून २०० हून अधिक तालुक्यांत पाणीटंचाईची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीडसह इतर १३ जिल्ह्यांत तर केवळ ५० ते ७५ टक्के पाऊस झाल्याने भीषण दुकाळाचे सावट आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आमदार खासदारांच्या बैठकीत आमदारांच्या चार वषार्तील कामगिरीचे रिपोर्ट कार्ड त्यांच्या हातात दिले आणि चार वर्षे आराम केला असेल तर आता उरलेल्या वर्षात जोमाने कामाला लागा अशा कानपिचक्याही दिल्या. ...
मान्सूनने माघार घेतल्यानंतर राज्यातील आॅक्टोबर हीटचा तडाखा दिवसागणिक वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे, राज्यातील काही शहरांचे कमाल तापमान ३७ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, वाढता उकाडा आणि ऊन नागरिकांचा घाम काढत आहे. ...
पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली, तर दुसरीकडे निधीअभावी ६१ सिंचन प्रकल्प रखडल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती मराठवाड्यात निर्माण झाली आहे. ...
ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या ३८४ जातींपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर महाराष्ट्राने देशातील पहिले ओबीसी मंत्रालय स्थापन केले. ...