भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे कर्नाटकमध्ये सत्तेसाठीचे राजकीय नाटक पुन्हा एकदा रंग भरू लागले आहे. तर दुसरीकडे आघाडी करून सत्तेवर असलेल्या जेडीएस आणि काँग्रेसमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. ...
कर्नाटकमध्ये काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर सर्वात कमी संख्याबळ असतानाही, जेडीएस पक्षाचे नेते आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे पुत्र एचडी. कुमारस्वामी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. ...
कॅबिनेटमधून बाहेर काढल्यामुळे रमेश जारकीहोळी यांनी नाराजी व्यक्त करत काँग्रेस सोडण्याची धमकी दिली आहे. तर, माजी मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्यासह अनेक काँग्रेसच्या आमदारांनी आपल्याला कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले नाही, म्हणून नाराजी व्यक्त केली आहे. ...