सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे. Read More
पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल खालीद जावेद खान यांनी पत्रकारांना सांगितले की, पाकिस्तानात वकिली करण्याचा परवाना असलेल्या कोणत्याही वकिलास भारत सरकार जाधव यांची बाजू मांडण्यासाठी नेमू शकते. ...
जाधव भारताच्या मदतीशिवाय वकिली करू शकत नाहीत, असेही याचिकेत म्हटले आहे. तसेच जाधव यांनी फेरविचार याचिका नाकारली असल्याचेही पाकिस्तान सरकारने न्यायालयात सांगितले आहे. ...
भारतीय अधिका-यांना जाधव यांना भेटण्याची संमती पाकिस्तानने गुरुवारी दिली. कुलभूषण जाधव स्वत:च्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्टीय न्यायालयात आव्हान देऊ इच्छित नाही, असे पाकिस्तान सांगत होता. ...
कुलभूषण जाधव यांचे संरक्षण करणं आणि त्यांचे भारतात परत येणं सुनिश्चित करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. त्या दृष्टीने भारत सरकार सर्व योग्य पर्यायांचा विचार करेल असे भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. ...
पाकिस्तानी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने जाधव यांना १७ जून रोजी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगितले होते, पण जाधव यांनी नकार दिला. ...
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना एक दिवस परत आणू, असा विश्वास माजी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया व सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील अॅड. हरीश साळवे यांनी शनिवारी दत्तोपंत ठेंगडी व्याख्यानमालेत व्यक्त केला. ...