सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे. Read More
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत सरकारने सातत्याने केलेला पाठपुरावा आणि आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे कुलभूषण जाधव प्रकरणात घेतलेली आडमुठी भूमिका पाकिस्तानने काहीशी मवाळ केली आहे. ...