कोपरगाव शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या संपूर्ण इमारतीचे पाच महिन्यापूर्वी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी (दि.५) झालेल्या पहिल्याच पावसात इमारतीच्या छताला गळती लागली आहे. ...
धोत्रे येथील १४ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर कोपरगाव येथील डॉक्टर महिलेच्या संपर्कातील १५ व्यक्तीचे व धोत्रे येथील एक असे एकूण १६ अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. संतोष विधाते व ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक ...
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील पोस्टमास्तरांनी सुमारे ५० ते ६० कावळ्यांच्या तावडीतून एका पक्ष्याला पर्यावरण दिनी जीवदान देवून अनोखी जबाबदारी पार पाडली. ...
मागील वर्षी जुलै महिन्यात एका व्यापारी महिलेवर गोळीबार करून फरार झालेल्या अक्षय खंडेराव जगताप (रा.ओमनगर, कोपरगाव) या आरोपीला पोलिसांनी मंगळवारी सापळा रचून अकरा महिन्यानंतर जेरबंद केले आहे. ...
लहान भावंडांनी एका काळविटाला कुत्र्याच्या तावडीतून वाचविले आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे बाबतता शिवारात गुरूवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. काळवीट कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहे. ...
कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव परिसराला निसर्ग चक्री वादळाचा तडाखा बसला आहे. यात झाडांची पडझड होवून झाडांच्या फांद्या वीज वाहक तारेवर पडल्या आहेत. यामुळे शिरसगावातील वीज पुरवठा दोन दिवसांपासून खंडित झाला आहे. ...
मागील आठवड्यात लोणी येथील रहिवासी व कोपरगाव शहरातील एका विद्यालयातील लिपीक कोरोनाबाधित झाला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या १३ व्यक्तींपैकी कोपरगाव शहरातील एका महिला डॉक्टरचा कोरोनाचा अहवाल गुरुवारी (दि.४) रात्री प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आह ...
राहाता तालुक्यातील ममदापूर येथील एका कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या संपर्कात आलेल्या पाच जणांचे अहवाल मंगळवारी (दि.२) प्राप्त झाले. ते निगेटिव्ह असल्याचे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौदर यांनी सांगितले आहे. ...