ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
धरणाची पाणी पातळी तब्बल ४८ तासांनंतर कमी होत असल्याने महान धरणातून सुरू असलेला विसर्ग ३ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता बंद करण्यात आला. यादरम्यान धरणातून १०.४५ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सद्यःस्थितीत धरणाची पातळी ८०.३४ टक्के आहे. ...
मागील पंधरवड्यापासून संततधार पाऊस सुरू असल्याचा लाभ धरणातील पाणीसाठा वाढण्यास झाला आहे. इसापूर धरणात ५०.८१ टक्के पाणीसाठा झाला असून, अजूनही पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस सुरूच असल्याने पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. ...
अकोला व मूर्तिजापूर शहरासह ६४ खेडी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांची तहान भागविणारे येथील काटेपूर्णा धरणाचा जलसाठा १ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता ८० टक्क्यांवर पोहोचल्याने धरणाचे चार वक्रद्वार ३० सेंटीमिटरने उघडण्यात आले. ...
काटेपूर्णा धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून, मंगळवार, ३० जुलै रोजी धरणातील जलसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने येत्या काही दिवसांत जलसाठा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
Dam tourism ok, what about safety? : जीव गेल्यानंतर हळहळण्यापेक्षा तसे होणार नाही याची खबरदारी घेतलेली केव्हाही बरी, जिल्हा प्रशासनानेही याबाबतीत पुढाकार घ्यायला हवा. ...