७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स या दोन संघांच्या पुनरागमनासहित शनिवारपासून इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) ११व्या सत्राची धमाकेदार सुरुवात होत आहे. ...
क्रिकेटचा सर्वांत मोठा उत्सव सुरू होत असून प्रत्येक जण यात सहभागी होण्यास इच्छुक आहे. आपल्या या खेळात टी-२० व वन-डे विश्वकप या सारख्या महत्त्वाच्या स्पर्धा होत असतात, पण क्रिकेटचा हा सर्वांत लोकप्रिय उत्सव आयपीएलची गोष्टच वेगळी आहे. ...
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा जर सलामीला आला नाही तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण यावेळी संघातील युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी रोहितने सलामीला न येण्याचा निर्णय घेतला आहे. ...