भारतीय संघ १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावाधीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसह या दौऱ्याची सुरुवात होईल. त्यानंतर भारतीय टी-२० संघ सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीत ऑस्ट्रेलियन मैदानात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळताना दिसेल.