गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या गुजरातमध्ये झंझावाती प्रचारात व्यस्त आहेत. बुधवारी त्यांनी भरूच येथे रोड शो केला. या दरम्यान तरूणांमध्ये राहुल गांधींबाबत क्रेझ पाहायला मिळालं. ...
गुजरात निवडणुकीत 154 नरेंद्र मोदी मतदान करणार आहेत. गुजरात निवडणुकीसाठी मतदान करणा-या 154 मतदारांचं नाव नरेंद्र मोदी आहे. या 154 नावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे. ...
'चीनसोबत स्पर्धा सुरु असतानाही देशात मेड इन चायना सुरु आहे. आपल्या मोबाइवरुन मोदी जेव्हा सेल्फी घेण्यासाठी बटण दाबतात, तेव्हा चीनमधील एका तरुणाला नोकरी मिळते', अशी टीका राहुल गांधींनी केली आहे ...
पाटीदारांना आरक्षण देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी हार्दिक पटेल यांनी दिलेल्या अल्टिमेटमला काँग्रेसने उत्तर दिले आहे. गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भरत सिंह सोलंकी यांनी पाटीदार नेत्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...
हार्दिक पटेलने काँग्रेसला आपली भूमिका मांडण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यतचा वेळ दिला आहे. यासोबतच काँग्रेसला चेतावणी देताना सुरतमध्ये जे अमित शाह यांच्यासोबत झालं तेच काँग्रेसससोबत होईल असं सांगितलं आहे. ...
नुकताच अटक करण्यात आलेला इसिसचा संशयित दहशतवादी काँग्रेस नेता अहमद पटेल ट्रस्टी असणा-या रुग्णालयात काम करत होता असा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केला आहे. ...