गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणाची पातळी खालावली आहे. गुजरातमध्ये भाजपाच्या नाकी नऊ आणणारा पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याचा कथित सेक्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. ...
अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष गुजरातमध्ये केवळ 11 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. मात्र असे असले तरी गुजरातमध्ये अडचणीत असलेल्या भाजपाच्या डोक्याला ताप देण्यासाठी आपने जोरदार पूर्वतयारी केली आहे. ...
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपाविरोधात जोरदार आघाडी उघडल्याने गुजरातमध्ये भाजपा बॅकफूटवर आहे. त्याचेच प्रतिबिंब आज प्रसिद्ध झालेल्या एबीपी न्यूज-सीएसडीएस-लोकनीतीच्या ओपिनियन पोलमध्ये दिसून आले आहे. ...