गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील मणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी वापरलेल्या भाषेचं समर्थन करु शकत नसल्याचं म्हणत त्यांनी माफी मागावी असं म्हटलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींनी आपलं मत व्यक्त केलं. ...
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या असभ्य टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पलटवार केला आहे. 'भलेही नीच जातीचा असलो, तरी कामं मोठी केली आहेत', असं सांगत नरेंद्र मोदींनी मणिशंकर अय्यर यांना सुनावलं आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा गुरुवारी थंडावणार आहेत. यादरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रश्न विचारण्याचा कार्यक्रम जारी ठेवला आहे. ...