गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
तैवानमधूनच एका महिलेने व्हिडीओच्या माध्यमातून अल्पेश ठाकोर यांना उत्तर दिलं असून आपलं मत मांडलं आहे. तुमच्या देशातील राजकारणात तैवानला घुसवू नका, असा सल्लाच या महिलेने दिला आहे. ...
मी मोदींचा 35 वर्षांपूर्वीचा फोटो पाहिलाय , ते माझ्याप्रमाणेच रंगाने काळे होते. जो पंतप्रधान दिवसाला 4 लाखांचे मशरूम खातो, म्हणजे महिन्याला 1 कोटी 20 लाखांचे मशरूम खातो त्यांना गरिबांचं जेवण आवडणार नाही कारण ते केवळ दिखावा करतात ...
गुजरातमधील महामार्ग भलेही गुळगुळीत असतील; पण रोजगार शोधणा-या अनेक तरुणांचा मार्ग खूपच खडतर आहे. चांगले वेतन आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी या तरुणांची धडपड सुरू आहे. ...
आपल्याच पक्षातील असंतुष्टांमुळे त्रस्त असलेल्या भाजप आणि काँग्रेसने संधी मिळेल तेव्हा एकमेकांच्या बंडखोरांना आपलेसे केले आहे. त्यामुळेच गुजरात निवडणुकीत यंदा आयाराम-गयारामांना महत्त्व आले. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या कडव्या हिंदुत्वावर मात करण्यासाठी काँग्रेस आणि राहुल गांधींनी सौम्य हिंदुत्वाची कास पकडली होती.दरम्यान राहुल गांधींनी आता चक्क रुद्राक्षाची माळसुद्धा धारण केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ...
यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर टीका केली. वैयक्तिक टीकाटिप्पणी करणाऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा सामील होते. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पूर्ण क्षमतेने उतरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गुजराती मतदारांना भावनिक साद घातली. आज एकापाठोपाठ एक केलेल्या ट्विटमधून मोदींनी मतदारांना भाजपाच्या बाजूने मतदान करण्याचे भावनिक आव ...
विकासाच्या मुद्यावरून घसरून वैयक्तिक टीकाटिप्पणीपर्यंत पोहोचलेला गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीचा प्रचार मंगळवारी संध्याकाळी थांबला. गुजरातमधील दुसऱ्या टप्प्याचे मतदान 14 डिसेंबर रोजी होणार आहे. ...