खाणी बंद झाल्यानंतर खाण कंपन्यांकडून कुणाला काढले नसल्याचे यापूर्वी सरकारने म्हटले असले, तरी वेदांता कंपनीकडून बार्जवरील १९० कर्मचा-यांना ब्रेक दिल्यामुळे त्यांना घरी बसणे भाग पडले आहे. या कर्मचा-यांनी न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. ...
तपास नाक्यांवर गेल्या तीन दिवसांत एकूण 225 मासळीवाहू वाहनांना थांबवून त्यामधील माशांची अन्न व औषध प्रशासन खात्याच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी तपासणी केली. ...
ड्रग्स माफिया व पोलीस यांच्यातील कथित संबध प्रकरणात माजी गृहमंत्री रवी नाईक यांचीही चौकशी होण्याची शक्यता असून एसआयटीकडून त्यांनाही समन्स जाणार आहेत. यापूर्वी त्यांचे पुत्र रॉय नाईक यांची चौकशी करुन जबानी नोंदवून घेण्यात आली होती. ...
परप्रांतातून गोव्यात आयात होणाऱ्या मासळीची तपासणी अन्न व औषध प्रशासन खात्याकडून चालूच असून आज पहाटे सलग दुसऱ्या दिवशी मासळी घेऊन येणारे 94 ट्रक हद्दीवर तपासले. ...
राज्यातील अंमली पदार्थाच्या (ड्रग्ज) विषयाबाबत पोलिसांनी सर्व शैक्षणिक संस्थांना पत्रे लिहिली होती. पण, अनेक विद्यालयांनी पत्राला उत्तरच दिले नाही. यापुढे शिक्षण खाते विद्यालयांचे ...