बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
यंदा मिलाप नगर निवासी विभागामधील गणेश विसर्जन तलावात गणेश मूर्तींचं विसर्जन करता येणार नाहीय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं तसा निर्णय घेत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ...
विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी लागणाºया विविध प्रकारच्या सजावटीच्या आकर्षक साहित्याने पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. ...
अवघी मुंबापुरी श्रींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, आता अवघ्या काही दिवस शिल्लक आहेत. लालबागसह दादरसह इतर बाजारपेठांमधील खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत असून अवघी मुंबापुरी श्रीगणेशाच्या भक्तिरसात तल्लीन झाली आहे. ...
गणपती उत्सवात गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करताना पूजा, गणेश याग, गण होम असे धार्मिक कार्यक्रम केले जातात. त्यामुळे सध्या पुरोहितांची मागणी वाढली असून, शहरातील कित्येक पुरोहितांचे अकरा दिवसांचे बुकिंग गणेशभक्तांनी अगोदरच करून ठेवले आहे. ...
गणेशोत्सवाच्या काळात चोरुन वीज वापरण्याचे प्रमाण वाढू लागल्याने ते रोखण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. अनधिकृत वीज वापरणा-यांवर दामिनी पथकाची करडी नजर रोखली जाणार आहे. ...
बाप्पाचा आवडीचा नैवेद्य म्हणून ओळखला जाणारा उकडीचा मोदक यंदा ठाण्यातील गणेशभक्त भरभरुन खरेदी करणार आहेत. गेल्या आठवड्यापासूनच मोदकाच्या आॅर्डर्स नोंदवल्या गेल्या असून अजूनही बुकींग सुरूच आहे. ...
कोकणातील आपल्या घरी गौरी-गणपतीच्या उत्सवाला जाण्यासाठी पालघर परिवहन विभागाच्या आगरातून एकूण २३६ बसेसची बुकिंग करण्यात आली असून ‘सर्वसामान्यांची जीवन वाहिनी’ समजली जाणा-या एसटीने प्रवाशांना सुखरूप कोकणात नेण्यास प्रारंभ केला आहे. ...