कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवाआधीच घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. प्रशासनाने आणि कुंभार बांधवांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी गणेशचतुर्थीच्या आधीपासूनच गणेशमूर्ती नेण्यास सुरुवात केली आहे. ...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे-बंगलोर महामार्गाच्या डागडुजीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने युद्धपातळीवर सुरू केले आहे. शेंद्रे ते नीरा पूल या दरम्यान रस्त्यावर युध्दपातळीवर खड्डे मुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ...
कोरोना संकटाच्या काळातही कोल्हापुरातील मंडळांकडून सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षीची परंपरा जपत यंदा साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी लहान आकारांतील मांडव उभारले जात आहेत. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन ज्या त्या प्रभागांमध्ये करण्याचे नियोजन आहे. परिसरातील मैदो, मोकळ्या जागा, रिकाम्या जागा या ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात येणार आहेत. ...
भक्तांकडे पाहुणचार घेण्यासाठी येणाऱ्या लाडक्या गणपती बाप्पांचा घरगुती उत्सव यंदा सहा दिवसांचा असणार आहे. यंदा सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने उत्सवाचा उत्साह कमी असला तरी देव घरी येणार म्हणून घरोघरी आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. ...