त्यांंची मैत्री फूटपाथवर फुलणारी अन् सुखासीन मुलांसारख्या आयुष्याचे स्वप्न पाहत संपणारी. पण यावर्षीचा मैत्री दिवस या अभावग्रस्तांसाठी मैत्रीची नवी पहाट दाखविणारा ठरला. ‘गुलमोहर’ बहरावा तसा त्यांचा दिवस फुलला आणि मैत्रीचा नवा अर्थ कळला. ...
नात्यांचा बहर मोसमागणिक खुलत जातो आणि श्रावणात तर नात्यांना अधिकच बहर येतो. मैत्रीच्या नात्याला तसे मोसमाशी कसलेच घेणे-देणे नसले तरीसुद्धा सर्वांगसुंदर अशा मोसमात जीवाभावाच्या सख्यांसोबत वेळ घालविण्याचा आनंद वेगळाच भासतो. ...
‘फ्रेन्डशीप डे‘ ऑगस्टच्या पहिल्या रविवारी येत असल्याने सर्वाधिक निराशा होते ती शाळेतील आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची. मात्र ते मार्ग काढतातच. रविवारऐवजी शनिवारीच विविध महाविद्यालयांमध्ये ‘फ्रेंडशीप डे’चा माहौल दिसून येत होता. अनेकांनी तर पालकांच् ...