फनी वादळाला फोनी असंदेखील म्हटलं जातं. बांगलादेशनं या वादळाला फनी हे नाव दिलं. फनी या शब्दाचा अर्थ साप असा होतो. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळांना भारत, श्रीलंका, बांगलादेश, मालदिव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान आणि थायलंडकडून नावं दिली जातात. याच देशांनी वादळासाठी नावं सुचवली होती. त्या नावांमधून बांगलादेशनं सुचवलेलं नाव या वादळाला देण्यात आलं. Read More
फनी या चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत 30 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. ओडिशातल्या पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडले आहेत. ...
‘फोनी’ चक्रीवादळाने ओडिशामधील लोकांचे प्रचंड आर्थिक, मानसिक आणि शारीरिक नुकसान झाले, शिवाय आतापर्यंत सोळा जणांचा जीव गेला आहे. या दुर्घटनाग्रस्तांना बिग बी अमिताभ बच्चन यांनी मदत जाहीर केली आहे. ...
अमिताभ बच्चन यांनी ओडिशातील लोकांना मदत जाहीर केली आहे. अमिताभ यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. 'मी मदत केली, तुम्हीही करा' असं सांगून देशवासीयांना मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले आहे. ...
फनी चक्रीवादळाने ओडिशात धुमाकूळ घातल्यानंतर तिथल्या स्थानिक प्रशासनाने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.या भागात अनेक मराठी अधिकारी काम करत असल्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. यातील गंजाम नावाच्या जिल्ह्यात अवघ्या ३६ तासांमध्ये जिल ...