भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी डोकलामसंबंधी केलेल्या वक्तव्याबाबत चीनने मौन पाळले आहे. मात्र डोकलामध्ये तैनात असलेले त्यांचे सैनिक देशाच्या स्वायत्ततेसंबंधी अधिकारांचा वापर करत आहेत, असे चीनने मंगळवारी सांगितले. ...
भारत आणि चीनमध्ये सीमा प्रश्नी येत्या शुक्रवारी पुढच्या फेरीची चर्चा होणार आहे. डोकलाममध्ये दोन्ही देशांमध्ये चाललेल्या 73 दिवसांच्या संघर्षानंतर पहिल्यांदा ही बैठक होत आहे. ...
भारत आणि चीनचे लष्कर आमने सामने आल्याने निर्माण झालेला डोकलाम विवाद मिटून आता चार महिने उलटले आहे. मात्र या प्रकरणात भारताच्या पवित्र्यामुळे झालेली कोंडी चीनला अद्याप विसरता आलेली नाही. ...
डोकलामवरून भारत व चीन यांच्यातील वाद शमल्याचे वातावरण निर्माण झाले असले तरी, आजही डोकलामध्ये चीनचे १८00 सैनिक तैनात आहेत. त्यामुळे कडाक्याच्या थंडी व बर्फवृष्टीत भारताला प्रथमच तिथे आपले सैन्य ठेवण्याची वेळ आली आहे. ...
मुंबई- कडाक्याच्या थंडीतही डोकलाम येथे चिनी सैनिक शक्तिप्रदर्शन करणार असतील तर हिंदुस्थानची भूमिका काय? चीनचे पंतप्रधान मागे एकदा अहमदाबादेत येऊन ढोकळा-फाफडा खाऊन गेले. आता त्यांच्या कानाखाली ‘फाफडा’ काढण्याची वेळ आली आहे. पण तसे घडेल काय?, असा सवाल ...
डोकलाममध्ये कायमस्वरुपी तळ उभारण्याचे चीनने जवळपास निश्चित केले आहे. डोकलाममध्ये सिक्कीम-भूतान-तिबेट या ट्राय जंक्शनजवळच्या भागात चीनचे 1600 ते 1800 सैनिक तैनात आहेत. ...
डोकलामनजीक सीमेवर चीनकडून विविध बांधकामे सुरू असल्याची बाब ही केवळ अफवा आहे. डोकलाममध्ये सद्यस्थितीत कुठलेही तणावाचे वातावरण नसून सर्व काही सुरळीत सुरू आहे, असा दावा केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के.सिंह यांनी केला आहे. ...