शहरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून, सहा ते आठ कुत्र्यांच्या टोळीने पाचवर्षीय बालिकेचे लचके तोडल्याची घटना शनिवारी दुपारी सूतगिरणी परिसरातील मैदानावर घडली. यावेळी नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांना पिटाळून लावल्याने बालिका बचावली. ...
सातारा येथील मोरे कॉलनीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून, सहाजणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. जखमी झालेल्या रुग्णांवर साताऱ्यातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरूवारी सायंकाळी घडली. ...