हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (मोहम्मद युसुफ खान) यांचे नाशिकशी बालपणाचे ऋणानुबंध जोडले गेले आहेत. त्यांच्या आई-वडिलांच्या कबरी आजही त्याची साक्ष देतात. येथील छावणी परिषदेच्या देवळाली कॅम्प भागात त्यांचे बालपण गेले. ...
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील एका जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या प्रकरणात झालेल्या फसवणुकीमध्ये दिलीपकुमार अडकले होते. या फौजदारी खटल्याच्या सुनावणीला दिलीपकुमार यांनी उपस्थित रहावे, असे समन्स जिल्हा व सत्र न्यायालयाने काढले होते. ...