पिक विमा योजनेत भाग घेण्यासाठी गहू, हरभरा, रब्बी कांदा पिकांना १५ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदत असल्याने या पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. ...
सांगली जिल्ह्यात सुमारे ८० हजार एकर द्राक्षबागेचे क्षेत्र आहे. हवामान बदल शासनाची उदासीन भूमिका आणि सातत्याने होणारे नुकसान, यामुळे द्राक्ष बागायतदारांनी ३० हजार एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात केली आहे. ...
नैसर्गिक आपत्ती आल्यास नुकसान भरपाई पोटी तब्बल ५० ते ८० हजार रुपये मिळत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी सुमारे चार लाख अर्जाद्वारे कांद्याचा विमा काढला होता. ...
विधानसभा निवडणुकीचे काम संपताच कृषी खात्याची यंत्रणा बोगस विमा क्षेत्र शोधण्यात गुंतली असून, राज्यातील सात-आठ जिल्ह्यांत कांदालागवड न करता विमा भरलेले बनावट क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याचे कृषी आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. ...
फळबागांच्या बनावट विम्याचे लोन आता कांदा पिकांपर्यंत पोहोचले आहे. कांदा लागवड कालावधी कधी अन् किती?, विमा भरलाय कधी अन् किती?, याच्या आकडेवारीचा मेळ लावण्यासाठी कृषी खात्याला डोके खाजविण्याची वेळ आली आहे. ...
कृषी आयुक्तालयाच्या पुढाकारामुळे बोगस अर्ज अपात्र करण्यात आले असून शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचे काम चालू आहे. कृषी विभागाच्या या कामामुळे शासनाचे हजारो कोटी रूपये वाचले आहेत. ...
यंदाच्या मृगबहारातील फळपिकांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे ७३ हजार ७८७ अर्ज आले होते. कृषी विभागाने सुमारे ४५ हजार अर्जाची पडताळणीत सुमारे साडेदहा हजार ठिकाणी बागांची लागवड नसल्याचे उघड झाले आहे. ...