Cotton, Yawatmal News कापसासाठी तंत्रज्ञान, व्यवस्थापनासोबतच विपनन आणि शासनाच्या धोरणाला महत्त्व आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आणि कापड उद्योजक यांचा करार व्हावा, असे मत येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद यादगीरवार यांनी व्यक्त केले. ...
हजार हेक्टरवर लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकांवर पहिल्याच वेचणीदरम्यान पानगळ सुरु झाल्याने कपाशीच्या झाडांना गळ लागून पाने झडत असल्याचा चिंताजनक प्रकार मंगळवार दि. ६ रोजी उघडकीस आला असून सोयगाव तालुक्यातील कपाशीचा हंगाम संकटात सापडला आहे. ...
जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के पाऊस झाला आहे. आणखीही पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. परतीचा पाऊस आणखी यायचा असल्याचे सांगितले जाते. आधीच झालेल्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना हवामान खात्याने आणखी पाऊस येण्याचा अंदाज वर्त ...
दिवाळी बोनस अशी सोयाबीन पिकाची ओळख. परंतु, यंदाच्या वर्षी सततच्या पावसाचा या पिकाला चांगलाच फटका बसला आहे. एकरी किमान तीन पोते तरी सोयाबीन होईल काय, हा प्रश्न सध्या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहेत. तर सिंचनाची सोय असलेले काही शेतकर ...
या हंगामातही सीसीआय व पणन महासंघाने कापूस खरेदीची तयारी सुरू केली. ग्रेडरची कमतरता असल्याने या हंगामात ३० केंद्र तसेच ६० ते६५ जिनिंगच्या माध्यमातून कापूस खरेदी होवू शकते. ...
यंदा सरासरीच्या तुलनेने अधिक पाऊस झाल्याने त्याचा फटका पिकांना बसला आहे. सोयाबीनची पिके पिवळी पडून मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने सोयाबीनचे सर्वेक्षण केले. पण कापसाचीसुद्धा अशीच स्थिती असताना त्याकडे दुर्लक्ष केले. कृषी समितीच्या झालेल्या बैठकीत ...
खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे गुरूवार दि. २४ रोजी एका रोहित्राचा स्फोट झाला. यात आग लागून शेतकरी चंद्रकांत बर्डे यांची अर्ध्या एकरमधील कपाशी जळून खाक झाली. ...
कापूस खरेदी व चुकारे करताना अडचणी येवू नये, यासाठी तेलंगणा राज्याने वापरलेल्या मोबाईल अॅपप्रमाणे महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाकडूनही यंदाच्या हंगामापासून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. ...