बऱ्याचदा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा वेचणीस आलेला कापूस भिजतो व त्यामुळे बरेच नुकसान होते. कापूस वेचणीच्या वेळी येणाऱ्या अवकाळी पावसाचा अंदाज घेऊन कापूस वेचणीचे नियोजन शेतकऱ्यांनी करावे. ...
केंद्र शासनाने लांब पल्ल्याच्या कापसाला ७०२० रुपये क्विंटलचा दर जाहीर केला आहे. याचवेळी खुल्या बाजारात कापसाचे दर घसरलेले आहेत. पुढील काळात कापसाचे दर यापेक्षा खाली घसरण्याचा अंदाज आहे. यामुळे शासकीय कापूस संकलन केंद्र उघडण्याची नितांत आवश्यकता आहे. ...
यंदा भारतासहित ब्राझील, अमेरिका, चीन यांसारख्या देशांतही कापसाचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे साहजिकच दर वाढणे अपेक्षित होते पण तसं होताना दिसलं नाही. ...